समाजाचे स्वास्थ बिघडवणाऱ्यांना पोलीसी डोस उपयोगी पडतो- डॉ. कुणाल सोनवणे

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

एखाद्याचे स्वास्थ बिघडलेकी तो डॉक्टरांकडे जावून औषधीचा डोस घेऊन बरा होता, मात्र जो सामाजाचे स्वास्थ बिघडविणारा असतो त्याला पोलिसांचा डोस दिल्यावरच तो बरा होत असल्याचे डॉ. कुणाल सोनवणे यांनी वरणगाव येथे आयोजित शांतता बैठकीत बोलत होते.

शहरात गेली पाच ते सहा दिवसापासून दोन समाजामध्ये ऐकीव गोष्टीवरून तेढ निर्माण झाल्याची अफवा पसरवून सामाजिक स्वास्थ खराब करण्याचे काम सुरू असल्याने शांतता कमेटीची बैठक घेऊन ते सुधारण्याचा प्रयत्न सह्य पोलीस निरिक्षक आशिष आडसुड यांनी केला होता, तरीही अफवाचा पेव सुरुच असल्याचे लक्षात आल्याने दि २३ सोमवार रोजी पोलीस स्टेशनच्या सभागृहात मुक्ताईनगरचे उपविभागीय प्रभारी पोलीस अधिक्षक कुणाल सोनवणे यांच्या प्रमुख व शहरातील दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी व तरुणांच्या उपस्थितीत शांतता बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलीस अधिक्षक सोनवणे यांनी मार्गदशन करते वेळी, एखाद्याचे स्वास्थ बिघडलेकी त्याला डॉक्टराकडे घेऊन जाऊन त्याच्यावर गोळ्या, औषधीचा डोस देवून बरे केले जाते. मात्र एखाद्याने सामाजिक स्वास्थ बिघडविले की त्यावर एकच पोलीसी डोसच प्रभावी ठरतो. तरुणांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता त्याची खात्री करून पोलीसांना माहिती देऊन पुढील अप्रिय घटना टाळावी, तसेच मोबाईल हाताळताना समाजमाध्यमांवर कोणताही चुकीचा संदेश पाठवू नका अथवा त्याला पुढे पाठवू नका. शहरातील सर्वच सामाजातील ज्येष्ठ व राजकिय पदाधिकाऱ्यांनी तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर सह्य पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांनी सर्व सामान्य नागरिक हे पोलिसांचे कान, नाक, डोळे आहे. ज्याप्रमाणे सीसीटीव्ही कॉमेरे ज्या प्रमाणे क्षण टिपतात त्याचप्रमाणे तुम्ही आमचे सीसीटीव्ही कॅमेरे आहात, तुमच्याकडून आम्ही घटना स्थाळावर पोहचण्याआधीच ठळू शकते. त्यासाठी आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत प्रत्येक प्रभागात पोलीस मित्राची नियुक्ती करणार असुन ती राजकिय किंवा एखाद्या व्यक्तीच्या शिफारशीने घेता तरुणाच्या पुढाकाराने नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले. काही उपद्रवीवर लवकरच कायदेशीर कारवाहीचा बडगा उगारला जाणार असून तरुणांनी अफवांवर विश्वास न ठेवता भांडणांपासून दूर रहावे. आपल्या परिसरात जातीय सलोखा निर्माण करून एकत्रित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
तर शहरातील राजकीय पदाधिकारी व समाजातील ज्येष्ठांनी यावेळी बैठकीत फक्त भाषण न देता सर्वांनी पुर्वीप्रमाणे एकत्रित राहण्याचे सुतवाच करीत “हम सब एक है” चा नारा देत निरधार केला.

या बैठकीत उप साह्य पो निरिक्षक परशुराम दळवी, चंद्रकांत बढे, अल्लाउद्दीन शेठ, मका शेठ, सुनिल काळे, सुधाकर जावळे, राजेंद्र चौधरी, समाधान महाजन, संभाजी देशमुख, शे अखलाक शे युसुफ, शे सईद शे भिकारी, सतोंष माळी, विजय वाघ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीस सर्वच स्तरातील नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here