creative ways to give money as gift for christmas ride the ducks stone mountain coupon clotilde sewing notions coupon code cheap meaningful gift ideas
Thursday, December 1, 2022

दोन तलवार बाळगून दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

- Advertisement -

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावात तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी शस्त्रासह ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोहर्डी गावातील तरुण जितेंद्र उत्तम कोळी याच्या जवळ विना परवाना व दहशत पसरविण्याच्या हेतून दोन तलवारी असल्याची गुप्त माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

या गुप्त माहितीनुसार पोलीस निरिक्षक आशिष आडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली उप सह पोलीस निरिक्षक परशुराम दळवी, सह फौजदार नरसिंग चव्हाण, पराग दुसाने, पंकज ठाकुर यांनी गावात जाऊन जितेंद्र याला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. यावेळी त्याने हत्यार असल्याचे कबुली देत त्याच्या घराच्या मागच्या बाजूला मक्याच्या ढिगाऱ्या खाली लपवून ठेवलेल्या एक बत्तीस इंच लांब व दुसरी बारा इंच लांब अशा दोन तलवारी पोलिसांनी त्याच्या ताब्यात घेऊन जितेंद्र कोळी यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोहेकॉ पराग दुसाने यांच्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सह फौजदार नरसिंग चव्हाण हे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या