पाणी टंचाईमुळे शिवसेना शहरप्रमुखांनी केला टँकरद्वारे पाणीपुरवठा

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरात पंधरा ते वीस दिवसापासून पिण्याच्या पाण्याची कृतीम पाणी टंचाई असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणुन शिवसेना शहप्रमुखाने वॉर्डातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी वाटप केले. यामुळे नागरिकांना पाणी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे तपत कठोरा रोडवर दुरुतीचे काम नगर परिषदेने हाती घेतले होते ते पुर्ण होत नाही, तो आणखी एका ठिकणी जलवाहिणी फुटल्या नंतर पाणी पुरवठ्यासाठी उशीर झाला होता. तर त्यात पुन्हा जॅकवेल जवळील फुटबॉल उघडा पडला व पाण्याचा साठा कमी प्रमाणात कमी झाल्यामुळे शहराला पंधरा ते वीस दिवसापासून पाणी मिळत नसल्याने शिवसेना शहर प्रमुख सतोष माळी यांनी स्वखर्चाने प्रभागात ट्रॅकरने पाणी पुरवठा करून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले

उन्हाळाच्या सुरुवातीलाच वरणगाव शहरात भीषण पाणी टंचाईने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील हातपंप देखील नादुरुस्त असल्याने हे भीषण पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. हातपंप वॉर्डा वॉर्डात आहे परंतु ते नादुरुस्त आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष दिले असते तर भीषण पाणी टंचाई उद्भवली नसती. या पाणी टंचाई समस्यासंदर्भात सर्वात अगोदर शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे नगरपरिषदमध्ये जाऊन बोंबाबोंब आंदोलन करून तात्काळ पाण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा हंडा मोर्चाचा इशाराही देण्यात आला होता. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

प्रशासकीय काळात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

प्रशासकीय काळात वरणगाव नगरपरिषदने नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी केला आहे. वेळोवेळी नागरी समस्या संदर्भात शिवसेनेने आवाज उठविला असल्याचेही त्यांनी सांगितले. आतातरी वरिष्ठांनी त्वरीत याकडे लक्ष देऊन वरणगावकराना या समस्येतून मुक्त करावे अशी मागणीही संतोष माळी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.