वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव शहराच्या सिध्देश्वर नगरमध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समाज कंटकांनी दगडफेक करून आबालवृद्ध महिलासह सात ते आठ जणांना जखमी झाले होते. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढून आरोपींना मोक्का लावण्याच्या मागणीचे निवेदन पोलीसात देण्यात आले तर चौघांना पोलिसांनी अटक केली.
त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हे गाणे का लावतो या कारणांमुळे डीजे मालकास मारहाण करीत समाज कंटकांनी मिरवणुकीत केलेल्या दगडफेकीत आबलावृद्ध महिलासह सात ते आठ किरकोळ जखमी झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरिक्षक जनार्धन खडेराव यांनी घटनेची वरिष्ठांना माहिती देत पोलीस व दंगा नियंत्रण पथकाची पाचरण करून घटना स्थाळाकडे धाव घेऊन समाज बांधवांना शांतता ठेवण्याचे आवाहन करीत सिध्देश्वर नगर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तर रात्री दगडफेक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
शनिवारी दि. ८ रोजी समाजबांधव एकत्रीत येत पोलीस स्टेशन समोर दोन तास दगडफेक करणाऱ्यास तात्काळ अटक करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी भुसावळ विभागीय पोलीस अधिक्षक यांनी येत्या दोन दिवसांत आरोपीस अटक करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
घटनेचे पडसाद सर्वत्र उमटल्याने ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व रोहन मेढे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार रोजी रेल्वे स्टेशन परिसर ते वरणगाव पोलीस स्टेशन पर्यंत समाज बांधवांनी घटनेचा निषेध मोर्चा काढण्यात आला. बस स्थानक चौकात दगडफेक करणाऱ्याला आरोपीला अटक करून मोक्का लावा अशा मागणीचे निवेदन पोलिसांनी देण्यात आले.
चौघांना अटक
घटना घटल्या नंतर दगडफेक करणारे घटना स्थाळावरून पसार झाल्या नंतर रात्रीच्या वेळी महिलानी पोलीस स्टेशन गाठत दगडफेक करणाऱ्यास तातकाळ अटक करण्या आग्रही भूमिका घेतल्याने दुसऱ्या पोलीस प्रशासनाने दोन दिवसांत अटक करण्याचे अश्वासन दिल्याने समाज बांधव शांत झाले नंतर पोलीस प्रशासनाकडून संशयीत आरोपीचा शोध घेत रविवारच्या रात्री चौघाना अटक करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगत सर्वच समाज बांधवांनी शांतता राखण्यासाठी आवाहन केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष व तरुण निषेध मोर्चात सहभागी झाले होते.