Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू
    जळगाव जिल्हा

    शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 13, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव तालुक्यातील वराड येथे शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    राहूल भरत जाधव (वय २८, रा. वराड ता. जि.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील वराड येथे राहूल हा आपल्या कुटुंबियांसह राहतात. तो मानसिक रुग्ण असल्याने तो अनेक दिवस घरी देखील जात नव्हता. शुक्रवारी १३ मे रोजी सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहरीजवळ गेले.

    दरम्यान, ते विहरीतून पाणी काढत असतांना त्यांना विहरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेतमालकाला दिली. शेतमालकासह सरपंच संदिप सुरळकर, राजेंद्र जाधव, भाऊलाल जाधव, पोलिस कर्मचारी राजेंद्र उगले यांच्यासह ग्रामस्थांनी शेतात धाव घेत पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहरीतून बाहेर काढला.

    यावेळी तो मृतदेह राहूल जाधवचा असल्याची समजले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.

    jalgaon Varad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif