या अभिनेत्रीचे ठरले लग्न; लवकरच उडणार बार…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा हास्य मालिका रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आता यातील अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकणार आहे.

वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. आता लवकरच ती सुमितबरोबर लग्न करणार आहे. वनिताने तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली आहे. वनिता फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न करणार आहे, असे वृत्त आहे. वनिताचा बॉयफ्रेंड सुमित हा व्हिडिओ क्रिएटर व ब्लॉगर आहे. वनिताने मराठीसह हिंदी चित्रपटात काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.