वाकडीच्या ९० वर्षीय वृद्धेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी नव्हे तर पेन्शनच्या पैशांसाठी खून

0

एलसीबीच्या पथकाला पाच दिवसांनंतर उलगडा ; आरोपी मुलाला अटक

जळगाव;-एका ९० वर्षीय वृद्धेला मारहाण केल्यांनतर तिचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील वाकडी येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी हि घटना सोन्याच्या दागिन्यासाठी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असतांना मात्र हा प्रकार पेन्शनच्या पैशांसाठी मुलाने केल्याचे एलसीबीच्या चौकशीतून समोर आले आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

राधाबाई भालचंद परदेशी (वय ९०, रा. वाकडी ता. जामनेर) असे मयत वृद्धेचे नाव असून गावात त्या एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) हा परिवारासह राहत असून त्याच्या दोन मुलींची लग्न झालेली आहेत.११ रोजी शनिवारी त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला होता. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला होता.

या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनसह एलसीबीचे पथक तपासासाठी कामाला लागले होते. मात्र खून कशासाठी व कुणी केला याचा उलगडा होत नव्हता,मात्र तपसातून हा खूनमयत राधाबाई यांचा मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी (वय ६५, रा. वाकडी ता. जामनेर) याने केल्याची कबुली त्याने दिली.

एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाला यश आले. मयत राधाबाई यांचे पती भालचंद्र परदेशी हे शिक्षक होते.

निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन सुरू होती. भालचंद्र परदेशी हे वारल्यानंतर ती पेन्शन राधाबाई यांना सुरू होती. दरवेळेला एकत्र तीन महिन्याची पेन्शन घेण्यासाठी राधाबाई यांच्यासोबत मुलगा सुभाष हा जायचा. पेन्शनच्या रकमेमधून चार पाच हजार रुपये आई राधाबाई हिला देऊन बाकीचे सुभाष हाच ठेवून घ्यायचा. आता मात्र राधाबाईने पेन्शन घ्यायला स्वतः जायचा निर्णय घेतला व सुभाषला सोबत येण्यास नकार दिला दिल्याने याचा राग सुभाषच्या मनात होता .

शनिवारी त्याने आईसोबत वाद घालून आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत आई राधाबाई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुभाष हा लगेच त्याच्या घरी निघून गेला. ५ दिवस तो पोलीस तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. मात्र गावातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि नेहमी तो आईला त्रास दियाचा यामुळे सुभाष परदेशी याच्या वर्तनावरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच खुनाचा उलगडा झाला. . तपास कामी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सफौ विजयसिंह पाटील, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, महेश सोमवंशी यांच्यासह फत्तेपूर पोलीस स्टेशनने परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.