Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»वढोदा येथे एक गाव एक देवी उपक्रम
    जळगाव

    वढोदा येथे एक गाव एक देवी उपक्रम

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 27, 2025Updated:September 27, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वढोदा येथे एक गाव एक देवी उपक्रम

    मनवेल ता यावल I लोकशाही न्यूज नेटवर्क 

    वढोदा प्र. येथे १९८५ साला पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच दुर्गा देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते.गेल्या ४० वर्षा पुर्वी स्व. नारायण आप्पा सोनवणे व गावकऱ्याच्या माध्यमातून परंपरा जोपासत जय दुर्गा मित्र मंडळ , गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात

    नऊ दिवस संपूर्ण गावातील ग्रामस्थ व भाविक एकत्र येऊन देवीची पूजाअर्चा, सकाळ-संध्याकाळ आरती व नवसपूर्ती विधी मोठ्या श्रद्धाभावाने पार पाडतात.
    या उत्सवाच्या काळात गावात एक वेगळे नवचैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळते. धार्मिक विधींबरोबरच मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, धार्मिक तसेच जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे हा उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा ठरतो.
    वढोदा गावातील विशेष आकर्षण म्हणजे शिरागड येथील श्री सप्तश्रृगी देवीचा मंदिरातून अखंड पायी ज्योत आणली जाते यात सुमारे ५० ते ५५ युवकांनी पायी चालत ज्योत वढोदा प्र यावल येथे पोहोचवली जाते. मंडळाने सांगितल्याप्रमाणे, ही पायी ज्योत यात्रेची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येणार आहे.

    संपूर्ण गावातून एकच देवीची स्थापना झाल्यामुळे सकाळ-संध्याकाळ सर्व ग्रामस्थ आरतीला एकत्र जमून भक्तीमय वातावरण निर्माण करतात. कै. नारायण आप्पा सोनवणे व नामदेव तुकाराम चौधरी यांनी दुर्गा मातेची मूर्ती गावकऱ्यां साठी अपर्ण केली आहे.कै. रामा बाविस्कर , कै. जनार्दन चौधरी,उत्तम बापु सोनवणे, सिताराम पाटील परिश्रम घेतात.सदर महोत्सव यावर्षी सुद्धा माजी जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी वडीलांची परंपरा कायम ठेवून अंखड पणे सुरू आहे याकामी दिनकर सोनवणे, तुकाराम सोनवणे, यंशवत बाविस्कर, सरपंच संदिप सोनवणे, उपसरपंच गोपाल चौधरी, राजेंद्र सोनवणे, लीलाधर सोनवणे, सुपडू सोनवणे, कीरण सोनवणे, सोपान सोनवणे, सुनिल सोनवणे, मुकेश चौधरी, नामदेव चौधरी, मुरलीधर चौधरी, चिंतामण भिल, कैलास सपकाळे सह पोलिस पाटील चेतन सोनवणे यांचे गांवकऱ्याचे सहकार्य लाभते मंडळाचा नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, गावातील एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम असल्याचे सर्वांनी नमूद केले आहे.

    #navratrotsav vadhoda Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif