वाडे येथील शहिद जवानावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व दिल्ली फरीदाबाद येथे ( सीआयएसएफ ) सेंट्रल इंडस्टीृयल सेक्युरीटी फोर्स मध्ये देशसेवा बजावत असलेले जवान फौजी मनोज लक्ष्मण चौधरी (वय ३५) यांचे दिल्ली येथे उपचार घेत असतांना त्यांचे निधन झाले. ही घटना दि. २२ रोजी राञी ८ वाजता दिल्ली येथे घरीच घडली. हे जवान डयुटीवर असतांना शहिद झाले. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. या जवानाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दिल्लीहुन विमानाने औरंगाबाद येथे मृतदेह आणणार आहेत. औरंगाबादहुन वाडे गावी अँम्बुलन्सने या जवानाचा मृतदेह आणणार आहेत. दि. २४ रोजी वाडे येथे वाघळी रस्त्यालगत शेतात या जवानाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनासह नातेवाईक मंडळींकडुन मिळालेली आहे.

शहिद जवान मनीष चौधरी हे वाडे येथील रहिवाशी व जि. प. विभागाचे सेवानिवृत्त लिपीक लक्ष्मण ओंकार चौधरी यांचे लहान चिरंजीव होतं. मनीष चौधरी हे जवान सी.आय. एस.एफ. मध्ये ९ वर्षापुर्वी दिल्ली येथे भर्ती झाले होते. ते दिल्ली फरीदाबाद येथे सध्या सेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, ३ वर्षाची मुलगी असा परीवार आहे. अंत्यसंस्कारासाठी भडगाव पोलीस स्टेशनमार्फत पोलीस बंदोबस्त लावलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.