वाडे वि.का.सो.मार्फत नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सत्कार

0

भडगाव ‘=तालुक्यातील वाडे येथील नागरीक व महिलांची विविध क्षेञात निवड झाल्याबद्दल श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळामार्फत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचीत पदाधिकार्यांना सन्मानीत करण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता

. यात श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन देविदास सहादु माळी यांची भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीत संचालक म्हणुन निवडुन आल्याबद्दल सत्कार पदाधिकार्यांमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच वाडे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालयाच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी दिनकरराव पतींगराव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच अरुण तुकाराम माळी यांची भडगाव महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदि बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच शरदिनी दिवाकर पाटील यांची भडगाव पिपल्स बँकेच्या नवनिर्वाचीत संचालीका पदि निवड झाल्याबद्दल तसेच यशवंत दुध उत्पादक संघाच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि गोपाल सुरतसिंग परदेशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि यशवंत दुध उत्पादक संघाच्या नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन पदि नारायण दगा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाचनालयाचे नवनिर्वाचीत संचालक अशोक परदेशी यांचाही सत्कार करण्यात आला.

या वरील सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सोसायटीच्या संचालक मंडळामार्फत शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देउन सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमाचे सुञसंचलन ग. स. चे माजी संचालक सुनिल निंबा पाटील यांनी केले. व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी वाचनालयाचे नवनिर्वाचीत चेअरमन दिनकरराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सर्व निवड झालेल्या नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. यावेळी विकासोचे चेअरमन देविदास सहादु माळी, डाॅ. दिवाकर वेडु पाटील, अशोक भुतेसिंग परदेशी, कैलास अभिमन माळी,उदयसिंग बाबुसिंग परदेशी, भाऊसाहेब नामदेव पाटील, साहेबराव कौतीक माळी, विजय रामलाल परदेशी, दिलीप अर्जुन मोरे, संचालीका संगीताबाई शांताराम पाटील आदि संचालक तसेच पिपल्स बँकेच्या नवनिर्वाचीत संचालीका शरदिनी दिवाकर पाटील, भडगाव महात्मा फुले शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचीत संचालक अरुण तुकाराम माळी, वाचनालयाचे नवनिर्वाचीत चेअरमन दिनकरराव पतींगराव पाटील, यशवंत दुध उत्पादक संस्थेचे नवनिर्वाचीत चेअरमन गोपाल सुरतसिंग परदेशी, नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन नारायण दगा माळी, संचालक भरत फुलचंद परदेशी, विकासोचे माजी चेअरमन अशोक दगडु पाटील, ग. स. चे माजी संचालक सुनिल निंबा पाटील, वाचनालयाचे संचालक तथा पञकार अशोक परदेशी, विकी पाटील यांचेसह पदधिकारी, नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्विततेसाठी संस्थेचे सचीव अर्जुन पाटील, क्लर्क प्रकाश वाणी, खत विभाग प्रमुख दिलीप पाटील, क्लर्क ज्ञानेश्वर माळी, सेवक हनुमान सोनार, दुलीचंद परदेशी आदिंनी परीश्रम घेतले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.