Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»‘व्ही. शांताराम’ यांचा जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर
    मनोरंजन

    ‘व्ही. शांताराम’ यांचा जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 1, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतीय चित्रपटाला नवी सौंदर्यभाषा, नवे कथन, नवी तांत्रिक दृष्टी आणि अद्वितीय प्रयोगशीलता देणारे महान दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे, म्हणजेच व्ही. शांताराम, यांचे विलक्षण आणि प्रेरणादायी जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य आणि ऐतिहासिक मेगा बायोपिकच्या माध्यमातून उलगडणार आहे. स्टुडिओमधील सामान्य कामगारापासून जागतिक ख्यातीचे कलावंत आणि प्रयोगशील दिग्दर्शक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे समर्पण, सर्जनशीलता आणि कलासाठी घेतलेली झुंज यांचा विलक्षण संगम आहे.

    ‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक संदेशापर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या सामाजिक वास्तवदर्शी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय सिनेमाला नवा आयाम दिला. त्यांचे जीवन म्हणजे वास्तव आणि कलात्मकता यांचे अद्वितीय दर्शन.

    याच वैभवशाली प्रवासावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या मेगा बायोपिकचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर त्याने तुफान धुमाकूळ घातला आहे. पोस्टरमधील भव्यता, रंगसंगती आणि सिनेमॅटिक लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्या कारकिर्दीतील ही भूमिका ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विशाल दृश्यरचना, कलात्मक तपशील आणि कथानकाची खोली यामुळे हा चित्रपट एक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे, असे ते सांगतात. ‘‘व्ही. शांताराम हे नाव घेतले की भारतीय चित्रपटसृष्टीची संपूर्ण परंपरा नजरेसमोर उभी राहते. त्यांच्या संघर्षाचा आणि प्रयोगशीलतेचा पडद्यावर पुनर्जन्म देताना एक वेगळी ऊर्जा जाणवली,’’ असे ते म्हणाले.

    राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत हा भव्यदिव्य सिनेमा येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मेगा बायोपिकमुळे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक सुवर्णपान पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif