Thursday, August 11, 2022

सातगाव (डोंगरी) येथील वि.का. सोसायटीने केलेल्या गाळ्यांचे बांधकाम बेकायदेशीर

- Advertisement -

– सहकार खात्याचा आदेश
– निधी काढण्यास मनाई

- Advertisement -

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील वि.का. सोसायटीने संस्थेच्या मालकिच्या जागेवर बेकायदेशीर रित्या  गाळे बांधून ते विक्री करीत असल्याने येथील ईश्वर नथ्थू पाटील यांचेसह २९ सभासदांनी गाळे विक्रीस स्थगिती मिळण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाचोरा यांचेकडे लेखी तक्रार केली होती. यावर सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी यांनी दि. २१ जुन २०२२ रोजी निकाल देत संस्थेचे सचिव व संचालक मंडळाने सहाय्यक निबंधकाची तसेच सक्षम अधिकाऱ्यांची पुर्व न घेता मनमानी पद्धतीने व बेकायदेशीर रित्या इमारत बांधकाम केलेले आहे. व गाळे विक्री केल्याने सदर प्रकरणाची पुर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गाळ्यांचा ताबा कुणालाही देता येणार नाही. यापुर्वी संचालक मंडळ व सचिव यांनी केलेल्या व्यवहारास स्थगिती देण्यात येत आहे.
सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील विका सोसायटीच्या संचालक मंडळ व सचिव यांनी कोणत्याही प्रकारची गाठे बांधकाम करण्यासाठी परवानगी न घेतल्याने ईश्वर नथ्थू पाटील यांचे सह २९ सभासदांनी दि. २३ मे २०२२ रोजी सहायक निबंधकाकडे तक्रार दाखल केली होती. यावर सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी यांनी दि. २१ जुन रोजी निकाल देत इमारत बांधकाम करण्यासाठी संचालक मंडळ व सचिव यांनी इमारत बांधकामा बाबत केलेला ठरावाची प्रत, वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या बांधकाम प्रस्तावाचे सिफारस पत्र, उपनिबंधक सहकारी संस्था जळगांव यांनी इमारत बांधकाम प्रस्तावात काढलेल्या तृटी व बांधकामाची परवानगी का दिली नाही त्या पात्राची प्रत, बांधकाम करण्यासाठी निधीची उपलब्धता करण्याबाबत मंजूर केलेल्या ठरावाची प्रत, बांधकाम करण्यासाठी तयार केलेल्या प्लॅन व इस्टिमेटची प्रत, ई निविदा काढल्याणी प्रतसह १९ प्रकारच्या पुर्ततेबाबत सचिव व संचालक मंडळास लेखी आदेश देवून सर्व कागदपत्रांसह दि. २९ जुन रोजी ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याचे सांगितले आहे.
पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बचत व चालु खात्यातून निधी काढण्यास मनाई
सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी यांनी सनस्थेचे सचिव व संचालक मंडळास लेखी आदेश देवून संस्थेस कोणाच्या परवानगीने इमारत बांधकामास किती निधी व कोणत्या खात्यातून उपलब्ध करून दिला आहे. त्याचा तपशील सादर करावा व या कार्यालयातील पुढील आदेश येईपर्यंत “पिक कर्ज वाटप वगळता” सचिव व संचालक मंडळाने संस्थेच्या बचत व चालु खात्यातून निधी काढण्यास मनाई केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या