लोकशाही न्यूज नेटवर्क
खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका नऊ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे घडली आहेहि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आर्यन अमर नलवडे वय ९ वर्ष असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता .त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलिंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
खेळत असताना ऑक्सिजनचे सिलिंडर आर्यनच्या डोक्यात पडले. गंभीर दुखापत झाल्यानं या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर आर्यन याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलिंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

