Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा
    कृषी

    डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य आहे. सध्या राज्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद हे प्रमुख अन्नद्रव्ये असतात.

    डिएपी खताची संभाव्य कमतरता लक्षात घेता, त्यास पर्यायी खतांचा वापर करणे गरजेचे ठरत आहे. यामध्ये एसएसपी (Single Super Phosphate) हे सर्वाधिक वापरले जाणारे पर्यायी खत असून, त्यात १६ टक्के स्फुरद, सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपीचा वापर फायदेशीर आहे. डिएपीच्या एका गोणीऐवजी, अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी यांचा समन्वयित वापर डिएपीस योग्य पर्याय ठरतो.

    तसेच, एनपीके (NPK) प्रकारातील संयुक्त खते जसे की NPK 10:26:26, NPK 20:20:0:13, NPK 12:32:16, NPK 15:15:15 यांच्या वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही प्रमुख अन्नद्रव्यांचा समतोल पोषण मिळतो. त्यामुळे या संयुक्त खतांचा उपयोगही पिकांसाठी उपयुक्त ठरतो.

    टिएसपी (Triple Super Phosphate) हे आणखी एक प्रभावी पर्यायी खत असून, त्यामध्ये ४६ टक्के स्फुरद आढळतो. डिएपीच्या एका गोणीच्या बदल्यात अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी वापरल्यास तोही डिएपीला उत्तम पर्याय ठरतो.

    कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, खरीप हंगामात केवळ डिएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा योग्य प्रकारे वापर करावा, जेणेकरून पेरणी व उत्पादनात अडथळा येणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif