विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0

लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील रहिवाशी प्रल्हाद पाटील, बाबुलाल चौधरी यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, ग्रामसेवक विरभद्र कोरे व तात्कालिन ग्रामसेवक रविंद्र शेळके यांना निलंबित करण्यात यावे, तसेच खडकदेवळा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना ग्रामपंचायत अधिनियम ३९ (१) अन्वये निलंबित करुन अपात्र घोषित करण्यात यावे. तात्कालिन ग्रामसेवक रविंद्र शेळके यांनी ग्रामपंचायतीतील त्यांनी गायब केलेली कोर्ट फाईल प्रशासनास उपलब्ध करून द्यावी. अशा मागण्यांसाठी खडकदेवळा ता. पाचोरा येथील गोकुळ देवरे हे २६ जानेवारी पासुन तब्बल तिसऱ्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. तसेच संबंधितावर कारवाई न झाल्यास भविष्यात पुढे न सांगता जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील उपोषणकर्ते गोकुळ देवरे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.