उपकारी व्यक्तिच्या प्रती कृतज्ञता ठेवा.

0

 

प्रवचन सारांश 30.03.2022

जीवन जगत असताना आपल्यावर अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींचे अनंत उपकार असतात. त्या सर्व उपकारी व्यक्तींच्या प्रती मनामध्ये सतत कृतज्ञता भाव ठेवावा असा संदेश आजच्या प्रवचनातून देण्यात आला.

स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचंद्र मुनी आदि ठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरु आहे. त्यात डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर मुनी यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन माला सुरु आहे. त्यात आज ‘उपकार’ या विषयावर चर्चा केली गेली. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्यांचे आभार मानायला हवे. उपकाराचे दोन प्रकार ‘ज्ञात’ व ‘अज्ञात’! आपण जीवन जगत असताना आपल्यावर अनेक अज्ञात व्यक्तींचे उपकार असतात. आज उपकाराच्या प्रती कृतघ्न असलेल्या व्यक्ती दिसतात. ज्ञात, अज्ञात उपकारी व्यक्तीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अहंकार’ आडवा येतो. ‘मेरी भावना’ या रचनेत “होउँ नहीं कृतघ्न कभी मैं, द्रोह न मेरे उर आवे…”  या काव्य ओळीचे विश्लेषण करताना  दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे त्यांनी दिली.  कृतघ्नता हीबाब आत्म्यासाठी नुकसानकारक असते, असे प्रवचनात सांगण्यात आले.

समाजात ४ प्रकारचे लोक असतात, उपकारी व्यक्तीच्याप्रती उपकार भावना ठेवणारे, उपकारीच्या प्रति अपकार भाव ठेवणारे या जगात आहेत. पुत्र आई-वडिलांचा, शिष्य गुरुंचा, मदतीला आलेल्या क्ष व्यक्तीबद्दल कृतघ्न भाव ठेवणारे महाभाग या जगात आहेत. मुलगा आई वडिलांचे उपकार मानत नाही. असे ही पहायला मिळतात.  अपकारीच्या प्रति अपकार करणाच्या आणि चौथ्या  प्रकारची व्यक्ती सज्जन असते. समोरच्या व्यक्तीने अपकार केले तरी ते त्यांच्या प्रती देखील उपकारच करत असतात. त्यासाठी एका राजाचे रूपक प्रवचनात सांगितले. उपकारीच्या प्रती उपकार आपण ठेवून कृतज्ञता भावना ठेवायला हवी. आज परिवारात ज्येष्ठ व्यक्तींचे उपकार विसरल्याने त्यांच्यावर वाईट दिवस येतात. वृद्ध आई वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात येते. घरातील ज्येष्ठांना दुर्दैवाने वृद्धाश्रमाचा मार्ग कुणीही दाखवू नये असे कळकळीचे आवाहान करण्यात येऊन ज्यांचे आपल्यावर उपाकर करून मदत केलेल्या त्यांच्याप्रती कृतज्ञता तर ठेवाच परंतु त्यांच्या विरुद्ध द्रोह अजिबात करू नका असा मोलाचा संदेश ही या माध्यमातून उपस्थितांना मिळाला.

१ ऑक्टोबर पासून नऊपद ओली आराधना सुरु होणार आहे. श्रीपाल यांनी नऊ पद ओली आराधना केल्याने काय झाले याबाबत स्मरण करण्यात येणार आहे. श्रीपाल चरित्र फक्त ऐकले तरी आपल्या जीवनात चांगला बदल घडतो. या नऊपद ओली आराधनेत श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले.

 

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

Leave A Reply

Your email address will not be published.