Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»…तोपर्यंत सांत्वनासाठी आमच्या घरी येऊ नका!
    महाराष्ट्र

    …तोपर्यंत सांत्वनासाठी आमच्या घरी येऊ नका!

    पित्याने राजकारण्यांना उद्देशून व्यक्त केला संताप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 3, 2026No Comments347 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनंतर आता पीडित पित्याने राजकारण्यांना उद्देशून दिलेला एक विनंती केली आहे. “जोपर्यंत माझ्या लेकीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत सांत्वनासाठी आमच्या घरी येऊ नका,” अशा शब्दांत पित्याने आपला संताप आणि दुःख व्यक्त केले आहे.

    पीडित मुलीचे वडील आपल्या चिमुरडीच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी देहू आणि आळंदी येथे गेले होते. विसर्जनाचे विधी सुरू असतानाच त्यांना घरी अनेक राजकीय नेते सांत्वनासाठी येत असल्याची माहिती मिळाली. ही बातमी ऐकताच पित्याचा संयम सुटला. त्यानंतर त्यांनी अस्थी विसर्जन केल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी अत्यंत भावूक होऊन सर्व राजकारण्यांना हात जोडून एक विनंती केली.

    मी माझ्या मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी बाहेर असताना मला घरून फोन आले की अनेक राजकारणी सांत्वन करण्यासाठी येत आहेत. पण माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटायला आमच्या घरी येऊ नये, ही आमची नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोणी लोकं असतील, ज्यांना आम्हाला भेटायचं असेल आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी माझ्या घरी माझे सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे, असे पीडित मुलीचे वडील म्हणाले.

    भोर तालुक्यातील नरसापूर परिसरात एका ६५ वर्षीय नराधमाने ओळखीचा फायदा घेत एका ४ वर्षांच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्या नराधमाने त्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा नराधम कुटुंबाच्या ओळखीचाच असल्याने परिसरातून अधिक संताप व्यक्त केला जात आहे.

    या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी गृहविभागावर जोरदार टीका करत आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी केली आहे. पीडित पित्याच्या या आवाहनामुळे राजकीय वर्तुळात शांतता पसरली असून, त्यांच्या शब्दांनी समाजातील संवेदनशील घटकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर पोक्सो आणि खुनाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif