Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दहावीच्या मुलांकडून शाळेतीलच मुलांवर अनैसर्गिक अत्याचार!
    गुन्हे वार्ता

    दहावीच्या मुलांकडून शाळेतीलच मुलांवर अनैसर्गिक अत्याचार!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या नावाखाली अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इगतपुरी पोलिसांनी या प्रकरणी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या याच वसतिगृहात खेड्यापाड्यांतील तसेच आदिवासी वस्त्यांवरील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याच वसतिगृहातील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवी पर्यंतच्या लहान विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या माध्यमातून धमकावत वसतिगृहापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे कॉटेजजवळील झाडाझुडपांच्या पडीक जंगलात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    विद्यार्थ्यांना धमक्या अन नशेची…

    विशेष म्हणजे या ठिकाणी कोणालाही संशय येणार नाही अशा एकांत जागेचा गैरफायदा घेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लहान विद्यार्थ्यांना धमकावून तसेच नशेची औषधे आणि मद्य देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पीडित विद्यार्थ्यांनी अनेक वेळा वसतिगृहातील जबाबदार व्यक्तींना या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर दबाव टाकून गप्प बसवण्यात आल्याचा आरोप देखील पुढे आला आहे.

    दरम्यान, वसतिगृहाचे नुकतेच नियुक्त झालेले अधीक्षक सुशांत दूधसाखरे यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    फॉरेन्सिक टीमने घेतले नमुने

    या संपूर्ण प्रकरणानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून काही महत्त्वाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात संस्थाचालक किंवा इतर सदस्यांचा काही संबंध आहे का तसेच आणखी काही विद्यार्थी या प्रकारात सहभागी आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. इगतपुरी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

    #hostel Children in conflict with law Igatpuri Igatpuri Police Nashik Ragging Social Welfare Department Unnatural torture
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.