Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम
    जळगाव

    रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम

    जागतिक महिला दिनानिमित्त : “अग्नीशीखा” महिला ग्रुपचा स्तुत्य उपक्रम  
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 20, 2026No Comments85 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहरात महिलांसाठी एक विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्नीशीखा” महिला ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २२ मार्च रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती झालेल्या पञकार परिषदेत अग्निशिखा महिला ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष भारती काळे यांनी दिली.

    महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, वाढते सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करून महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन, याशिवाय महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिन्याला येणाऱ्या समस्यांबाबत (मासिक पाळी व इतर आरोग्य विषय) तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष चर्चासत्र, व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले असून समाजातील व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात प्रथमच महिलांसाठी असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

    यांचा होणार सन्मान

    विशेष म्हणजे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, उत्कृष्ट काम करणाऱ्या नर्सेस व डॉक्टर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. डॉक्टर निलेश चांडक, डॉक्टर सीमा पाटील, डॉक्टर पूजा सोमानी, डॉक्टर प्राची महाजन, डॉक्टर नितीन विसपुते, डॉक्टर अविनाश खेलवाडे, प्राध्यापक वासुदेव पाटील, डॉक्टर श्रद्धा राणे, डॉक्टर शीतल पाटील, सौ. जागृती येवले, सौ. तृप्ती कांकरिया, सौ युगंधरा सोळुंके, डॉक्टर अवधूत चौधरी, डॉक्टर रुकसाना खान याना अग्नि शिका महिला ग्रुपच्या वतीने खान्देश रत्न पुरस्काराने येत्या रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

    April 10, 2026

    जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!

    April 10, 2026

    नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.