अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज भारत सरकारच्या 2025 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी यंदा आठव्यांदा भारताचा अर्थसंकल्प मांडला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले होते. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त झालीत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढले होते. यावेळीच्या अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया.

 

काय झाले स्वस्त?

 

दागिने, इलेक्ट्रोनिक वाहने,

कॅन्सरचा उपचार, वैद्यकीय उपकरणे

एलईडी आणि एलसीडि टीव्ही

चामडीच्या वस्तु

लहान मुलांची खेळणी स्वस्त

भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे स्वस्त होणार

विमा स्वस्त होणार

मोबाईल फोन स्वस्त

कॅन्सर औषधांवारील कस्टम ड्यूटि हटवण्यात येणार आहे.

35 जीवनावश्यक औषधे करामधून वगळली आहेत.

 

काय झाले महाग ?

कपडे , घर महाग होणार आहे.

अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञानासह , शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य, पर्यटन, उद्योग यांसह इतर क्षेत्रांसंबंधित महत्वाच्या घोषणा झाल्या. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कृषी क्षेत्र, तसेच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, विविध क्षेत्रांमध्ये नवे प्रकल्प, सुधारणा आणि विविध योजना सुरू करण्याची अपेक्षा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.