Friday, December 9, 2022

आमदाराच्या घरासमोर सापडली सोने- चांदीच्या मूर्ती आणि नोटांनी भरलेली बॅग

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भाजप आमदार आणि नेते प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांच्या घरासमोर एक बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये सोने, चांदीच्या मूर्ती (Gold-Silver Idols) आणि रोख रक्कम (Cash) सापडली आहे. सुरुवातीला या बॅग मध्ये नेमके काय आहे यावरून परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र नंतर यात पैसे आणि सोने चांदी सापडल्यानंतर ही बॅग कुणाची आहे, त्याने ही बॅग प्रसाद लाड यांच्या घरासमोर का टाकली अजून समजू शकले नाही.

- Advertisement -

- Advertisement -

प्रसाद लाड यांच्या माटुंगा (Matunga) येथील घराबाहेर सुरक्षा रक्षकाला बॅग आढळून आली. त्याने प्रसाद लाड यांना याबाबत कल्पना दिली अशी माहिती समोर आली आहे. पहाटे कुणीतरी ही बॅग सोडून पसार झाले असावे असा प्राथमिक तपासातून समोर येत आहे. दरम्यान, अशा प्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आज आषाढी एकदशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची बॅग सापडने याकडेही संशयाने बघितले जात आहे.

 बॅगमध्ये काय आहे ?

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर पहाटे पैशाने भरलेली बॅग सापडली. या बॅगमध्ये सोने, चांदी, मूर्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लाड यांचे घर माटुंगा परिसरात आहे. आमदारांच्या घराला सुरक्षा असताना अशा प्रकारे बॅग सापडने याकडे संशयाने बघितले जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या