डी.एड, बी.एड : वाढती बेरोजगारी आणि तरुणांमधील नैराश्य

0

लोकशाही, विशेष लेख

२००७-०८ पासून शिक्षण क्षेत्रातील अध्यापक होण्यासाठी लागणारी पदवी आणि पदविकेसाठी महाराष्ट्रात अनेक डी. एड (D. Ed), बी. एड (B. Ed) महाविद्यालयांना परवानगी मिळाली. त्यानंतर याच परवानगी मिळालेल्या अनेक महाविद्यालयामधून अनेक असे छात्र अध्यापक तयार होऊन बाहेर निघाले; परंतु त्यानंतर फक्त २०१० मध्येच मेरिट नुसार शिक्षकांसाठी पदभरती झाली. अनेक असे उमेदवार या भरतीतून मेरिटमध्ये येऊन मास्तर झालेत, तर काही मेरिटमध्ये नसल्यामुळे त्यांना थांबावं लागले. एकीकडे वाढते महाविद्यालय तसेच, वाढते उमेदवार तर दुसरीकडे भरती बंद असल्याने बेरोजगारी आणि याच बेरोजगारीमुळे या डीएड, बीएड बेरोजगार युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले.

२०१२ मध्ये भरतीवर बंदी आली असल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढत होती. अनेक शिक्षक सेवानिवृत्त होऊन बरीच पदे रिक्त असून सुध्दा शिक्षक भरती बंद असल्यामुळे बेरोजगारीची टक्केवारी वाढत होती. बेरोजगारीचा आलेख हा वाढतच होता. अक्षरशः २०१० पासून ते २०१७ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक महाविद्यालयामधून बरेचसे बेरोजगार डीएड बीएड तरुण (शिक्षक) निर्माण झाले. बारावी आणि पदवी नंतर २ वर्ष डीएड बीएड करून मास्तर होण्याची इच्छा मात्र अनेक तरुणांच्या मनातच राहून गेली.

या डीएड बीएड बेरोजगार तरुणांना घेऊन अनेक डीएड बीएड संघटना शिक्षक पद भरतीसाठी विविध असे आंदोलन, उपोषण, मोर्चे बांधणी वेळोवेळी करत आली व करावीच लागत आहे.

सन २०१७ पासून प्रवास (अ) पवित्र पोर्टलचा

सन २००७ पासून या महाविद्यालयातून पास होऊन निघालेल्या (२०१० नंतरच्या भरती नंतर) जसजसे शासन सत्ता बदलत गेली तसतशी त्याची भरतीबाबत भूमिका बदलत गेली. अनेक बेरोजगार तरुणांना एक आशेचा किरण म्हणून उजाळले ते वर्ष म्हणजे २०१७ पवित्र पोर्टलचे. परंतु ही सन २०१७ ची पवित्र पोर्टल मार्फत भरती सुद्धा फोल ठरली. शासनाने २०१७ च्या पवित्र पोर्टलद्वारे घोषणा केलेली १२ हजार शिक्षकांची पद भरती सुध्दा पूर्णपणे पूर्ण न करता तिला निव्वळ ६ हजारच्या जवळपास पदे भरून २०१७ ते आजतागायात तोच प्रवाच सुरूच आहे. हीच भरती पूर्ण न करता शासनाने २०२३ मध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी घेऊन सुमारे ३० हजार ते ५० हजार शिक्षक पद भरतीची घोषणा केली.

अशा अनियमित व पूर्ण न झालेल्या भरतीचा निर्णय घेऊन शिक्षक होणाऱ्या लाखो डी एड, बी एड धारकांच्या आयुष्यात शासनाने विरजनच टाकल्यासाख आहे. लाखो डीएड, बीएड धारकांना आता डीएड, बीएड केल्याचा पश्र्चाताप होताना दिसत आहे. एकंदरीत डीएड बीएड धारकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाल्याचे चित्र आहे.

ओळखलत का शासन मायबाप मला
डीएड बीएडची पदवी हातात घेऊनी आला कोणी
चेहऱ्यावर आहे नैराश्य डोळ्यात आहे थोडे पाणी
टीईटी, सीटीईटी देऊन सुद्धा प्रतिक्षाच करत आहे
आता तरी मास्तर करा मायबाप हो
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीही देत आलोय
नकोच नुसत्या घोषणा साहेब हो
कृती मात्र हवी आहे
घोषणा नुसत्या ऐकून ऐकून
स्मित हास्य करून उठला
घोषणा नको मायबाप हो आता
कृती मात्र हवी आहे, कृती मात्र हवी आहे

समाजात निःपक्ष आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशेसाठी किंवा शिक्षक होण्यासाठी एवढ्या आयुष्याची आहुती द्यावी लागेल, असा विचार सुद्धा डीएड, बीएड धारक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला नसेल. आपला बंडू शिक्षक होईल आणि आपले दिवसमान बदलविन, अशी अपेक्षा करणाऱ्या आई-वडिलांचे विचार सुध्दा हवेतच राहून गेलेत.

शिक्षक होण्यासाठी शासनाने अनेक महाविद्यालयांना परवानगी देऊन लाखो डीएड बीएड धारक (बेरोजगार तरुण शिक्षक)तर निर्माण केलेत, पण त्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी त्या त्या वेळचे शासन/सत्ता अपूर्ण व कमी पडल्यात. याची झळ फक्त आणि फक्त या बेरोजगार डीएड बीएड धारकांनाच सोसावी लागत आहे. आता शिक्षक होण्यासाठी डीएड बीएड करा, टीइटी, सीटीइटी पात्र व्हा, मग शिक्षक अभियग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला सामोरे जा. मग पवित्र पोर्टलला नोंदनी करा, अशा विविध मार्गाने जाऊन सुद्धा प्रतीक्षेतच रहा आणि शेवटी निराशाच. शेवटी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नंतर पुढे प्रतिक्षाच.

कसे कसे कठोर हे शासन
नाही बेरोजगारांच्या भाकरीवर बेसन
केव्हाचा डीएड बीएड झालोया
आम्ही डीएड बीएड धारक

आम्ही टीईटी पात्र झालोया
आम्ही सीटीइटि पात्र झालोया,
आम्ही डीएड बीएड धारक

आम्ही पवित्र नोंदनी केलीया
आम्ही शुल्कही भरलीया
आम्ही डीएड बीएड धारक

आम्ही शिक्षक अभियोग्यता देलिया
आम्ही बुद्धिमत्ता चाचणी देलीया
आम्ही डीएड बीएड धारक

आम्ही लाखोत बेरोजगार
आम्ही डीएड बीएड धारक

कवा शिक्षक होईल
कवा टेन्शन कमी होईल
आता आशेवर जगतोया
आम्ही डीएड बीएड धारक

इकबाल पिंजारी
लोकशाही ऐनपूर प्रतिनिधी
मो क्र : 9881969679

Leave A Reply

Your email address will not be published.