अखेर दाऊदचा ठिकाणा सापडला; भाच्याची ED समोर कबुली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अखेर ईडीच्या चौकशीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याची माहिती समोर आली आहे.

दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिली आहे. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

यावेळी अलीशाह पारकरने ईडीला सांगितलं, “दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, दाऊदची बायको महजबीनने सणांच्या काळात माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here