Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आंतरजातीय विवाहाचा राग अनावर
    ताज्या बातम्या

    आंतरजातीय विवाहाचा राग अनावर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 1, 2026No Comments474 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तरुणावर जीवघेणा हल्ला : उपचारादरम्यान मृत्यू

    जळगाव – जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडगाव सहो येथे आंतरजातीय प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुभाष चौधरी (वय 29) याने संशयित आरोपी अभिषेक संतोष मोरे याच्या बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग मनात धरून अभिषेक मोरे याने प्रशांतवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यावेळी त्याच्या डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत करण्यात आली होती. घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रशांत चौधरी याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
    घटना घडल्यानंतर फत्तेपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अभिषेक मोरे याला अटक केली होती. सुरुवातीला गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जखमीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणात खुनाचे कलम वाढवून गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करत असून, आंतरजातीय विवाहाच्या कारणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif