Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»साडेसहा एकर जमिनीसाठी काकाला किडनॅप करून मारहाण
    कृषी

    साडेसहा एकर जमिनीसाठी काकाला किडनॅप करून मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जमिनीसाठी पुतण्या काकाच्या मुळावर उठल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. पुतण्याने जमिनीसाठी काकाचे अपरहण केलं. डांबून ठेवत त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरद्ती करत पुतण्याने तब्बल साडेसहा एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली. या घटनेमुळे धाराशिवमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या पीडित व्यक्तीची तक्रार पोलिसांनी नोंद करून घेतली नाही असा आरोप त्यांनी केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटसांगवी गावात ६० वर्षांच्या काकाचे सख्ख्या पुतण्याने अपहरण केले. पुतण्याने काकाकडून जबरदस्तीने जमीन खरेदी करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित वृद्ध शेतकऱ्याला अनेक दिवस डांबून ठेवून मारहाण आणि दमदाटी करण्यात आली. या दबावाखाली त्याच्या नावावर असलेली साडेसहा एकर जमीन जबरदस्तीने पुतण्याने खरेदी करून घेतल्याचा आरोप आहे.

    पोलिसांनी तक्रार न स्वीकारल्याचा आरोप 

    या प्रकरणात पुतण्यासह काही गुंडांचा सहभाग असल्याचे शेतकरी शहबुद्दीन सय्यद यांनी सांगितले आहे. यासंदर्भात शेतकरी शहबुद्दीन सय्यद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी तक्रार स्वीकारली नसल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. वृद्ध शेतकऱ्याचे अपहरण करून मारहाण होऊनही पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

    दरम्यान, न्याय मिळावा आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून जमीन परत मिळावी, या मागणीसाठी शहबुद्दीन सय्यद यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे भूम तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोणतिही कारवाई न केल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    #crime #kidnapping #police Beating Dharashiv nephew Uncle
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.