जळगाव /अयोध्या ;- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावात रविवारी, झालेल्या सभेत अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर लोकांच्या परतीच्या प्रवासादरम्यान “गोध्रासारखी” घटना घडण्याची शक्यता असल्याबद्दल वक्तव्य केले होते . याला अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना याचे खंडन केले आहे . अयोध्येत प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे. इथे पान सुद्धा हलवू शकणार नाही. सतपाल मलिक, प्रशांत भूषण आणि उद्धव ठाकरे हे तिघेही घाबरवण्याचे काम करत असल्याचे सांगितले.
आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक या तिघांवरच आरोप केला आहे. हे तिघेच दंगे भडकवतील की काय अशी भीती आम्हाला आहे, असं सत्येंद्र दास म्हणाले. सर्व तयारी झाली आहे. राम लल्ला स्थानापन्न होतील. सर्व काही शांततेत पार पडेल. संपूर्ण कार्यक्रम 22 जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
राम मंदिराच्या उद्घटानाला देशभरातून हिंदूंना बोलावलं जाईल. रेल्वे, ट्रक, बसने भाविकांना अयोध्येत बोलावलं जाईल. सोहळ्यातून परतताना एखादं शहर किंवा वस्तीत गोध्रा घडवले जाईल. असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर अयोध्येतील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी यावर आपली तिखट प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार खंडन करून अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडक असून साधे पानही हलणार नाही असे त्यांनी सांगितले.