Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता !
    राजकारण

    ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 23, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे रविवारी बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले. ही भेट कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त असली, तरी ठाकरे बंधूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका दोघे एकत्र लढण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. मात्र भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार, शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे दावे केले  आहेत.

    राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयवंती यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या विवाहानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. इतकेच नव्हे, तर एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसले. मनसे आणि ठाकरे गटाचे समर्थक दोघे एकत्र येण्याचे ‘सुखचित्र’ पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. अशावेळी राजकीय पटलावरही दोघे एकत्र येणार का याची चर्चा आहे.

    कुठल्याही लग्न सोहळ्यात, नातेवाईकांमध्ये परिवारातील लोकांनी एकत्र येणे ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी तर सांस्कृतिक कार्य खात्याचा मंत्री आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसाच्या संस्कृतीप्रमाणे लग्न किंवा सोहळ्या ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्याचं मी स्वागतच करेन, अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

    दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या चर्चा उडवून लावल्या. ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका लग्नात भेटल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याचे कारण नाही. जर उद्धव ठाकरेंसोबत यायचंच असतं, तर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी गेले असते. राज ठाकरेंनी अनेकदा टाळी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरेंनी नेहमीच हात मागे घेतला. हे दोघे भाऊ एकत्र येतील असे मला वाटत नाही, निदान इतक्यात तरी नाही’ असे शिरसाट म्हणाले.

    Raj Thackeray uddhav thackeray
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026

    संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती

    August 10, 2026

    इथेनॉल मिश्रण : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या…

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif