Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»“उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही..!”
    ताज्या बातम्या

    “उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही..!”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 4, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    येत्या ५ जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडणार  आहे. या विजयी मेळाव्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरु आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या मेळाव्यावर आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. आता रामदास कदम यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत ठाकरे बंधूंच्या एकजुटीवरच शंका उपस्थित केली. “हिंदी सक्तीच्या विरोधात विजय जल्लोष कसला साजरा करताय. हिंदी सक्ती उद्धव ठाकरे यांनी केली”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

    “मुंबईतील सोसायट्यांमध्ये जेव्हा मराठी माणसांना मांस खाण्यास मनाई केली जाते, तेव्हा हे लोक कुठे जातात, असा सवाल रामदास कदम यांनी विचारला. मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे त्यांचे सरकार होते, त्यांनी मराठी माणसांसाठी काय केले? मराठी माणूस गिरगाव, दादर येथून अंबरनाथ-कल्याण येथे गेला. आता मुंबईत मराठी माणूस फक्त १७ टक्के उरला आहे. जेव्हा दोन जिल्ह्यांची, पुणे आणि नाशिकची मागणी केली होती, तेव्हा नाही जमले, आता का वाटी घेऊन हात पसरवतात?” असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला.

    “उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे. त्याचा दाखवायचा चेहरा वेगळा आहे. राज ठाकरेंनी जरा समजून जपून पुढचा विचार करा असा सल्ला रामदास कदम यांनी दिला. तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे वापरून घेतील. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाला नाही, तुमचा कसा होणार?” असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला.

    शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं

    “मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, तर उद्धव ठाकरे पुन्हा काँग्रेसकडेच जातील. मनोहर जोशी यांना लाखो लोकांसमोर मंचावरून खाली पाठवले, रावतेंना काहीच दिले नाही. शेवटी, शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे कोणाचा भाऊ होऊ शकत नाही. पळ मेल्यानंतर शेवटी वावळतोय,” अशा बोचऱ्या शब्दांत कदम यांनी टीका केली. रामदास कदम यांच्या या विधानांमुळे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या टीकेला ठाकरे बंधू कसे प्रत्युत्तर देतात”, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    #maharashtra #ramdas kadam Balasaheb Thackeray Hindi compulsion Hindi compulsion opposition MNS Mumbai Raj Thackeray shiv sena uddhav thackeray victory rally
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif