उचकी का लागते ?; सोप्या घरगुती उपायांनी सेकंदात थांबवा उचकी

लोकशाही न्यूज नेटवर्क

उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आठवण काढली वाटतं ?’ आपणही त्यावर हसून पाणी पितो आणि उचकी थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी त्वरीत थांबते देखील. कधी दीर्घ श्वास घेऊन तर पाणी पिऊन उचकी थांबवणे आपल्याला माहीत आहे.

उचकी थांबण्याचे उपाय

आपल्याला माहीत आहेत तसंच आपण करतो. उचकी लागणे उपाय अनेक आहेत. आपण या लेखातून उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. पण त्याआधी उचकी लागण्याची कारणे नक्की काय आहेत हेदेखील जाणून घ्यायला हवे.

उचकी का लागते ?

डायाफ्राम नावाच्या मांसपेशी हृदय आणि फुफ्फुस्साला पोटापासून वेगळं करतात. श्वासोश्वाच्या बाबतीतही यांची मुख्य भूमिका असते. जेव्हा या मांसपेशींमध्ये काही कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन होतं तेव्हा आपल्या फुफ्फुस्सांमध्ये हवा जाण्यासाठी जागा तयार होते. जेव्हा या मांसपेशींचं आकुंचन वारंवार होऊ लागतं. तेव्हा आपल्याला उचकी लागते. उचकी लागल्यावर जो आवाज येतो तो ग्लोटिस (वोकल कॉर्ड्स म्हणजेच कंठातील मोकळ्या जागेतून) च्या लवकर-लवकर बंद होण्याने येतो. उचकी का लागते त्याची नेमकी कारणे काय आहे आहेत ते पण जाणून घेऊया.

उचकी लागण्याची कारणे

उचकी का लागते आणि वरील परिस्थिती नेमकी कशी निर्माण होते आणि उचकी येण्यामागे ठराविक असं कारण नाही. पण काही सामान्य कारण खालीलप्रमाणे आहेत –

– गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने, खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाल्ल्याने आणि घाईघाईत खाल्ल्याने उचकी लागते.

– मद्यपान किंवा एअरेटेड कोल्ड ‌ड्रिंक्स प्यायल्याने धुम्रपान केल्यामुळे उचकी लागते.

– तणाव, घाबरणं, अतिउत्साह यामुळेही बरेचदा उचकी लागते.

– हवेच्या तापमानात अचानक बदल झाल्यानेही उचकी लागू शकते.

उचकी लागणे उपाय अनेक आहेत. त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि घरातली कोणत्या पदार्थांमुळे उचकी थांबविण्यासाठी कसा फायदा होतो ते आपण जाणून घेऊया.

साखर
एक चमचा साखर साधारण 30 सेकंदासाठी आपल्या तोंडामध्ये साखर ठेवा आणि नंतर ती चावा आणि गिळा. गरज असल्यास, दोन वेळा करा. नाहीतर एकदा करूनही उचकी थांबते.

मध
एक मोठा चमचा मध सेवन करा. मधामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल गुण आढळतात. याचा वापर केल्याने तुम्हाला जास्त दिवसांपासून सर्दी खोकला असल्यासदेखील होतो. घशाच्या संक्रमणामुळे उचकीचा त्रास होऊ शकतो आणि या समस्येतून सुटका मिळवून देण्यास मध मदत करतो. त्यामुळे उचकी पटकन थांबण्यास मदत मिळते.

लिंबू
लिंबाचा तुकडा कापलेल्या लिंबावर साखर घाला आणि ते लिंबू चोखा. उचकी लागल्यावर एकदा या प्रक्रियेचा उपयोग केल्याने उचकी निघून जाते. लिंबू एक सिट्रस फळ आहे आणि ज्याचा उपयोग उचकी थांबविण्यासाठी होऊ शकतो. उचकी वाढविणाऱ्या नसांना उत्तेजित करून आराम मिळवून देण्यास याचा उपयोग होतो.

पाणी
दोन ते तीन ग्लास थंड पाणी हळूहळू प्या. घटाघटा पिऊ नका.  उचकी लागल्यावर तुम्ही पाण्याचा उपाय सर्वात पहिले करता आणि हा उपाय अत्यंत सोपा आहे. पण घटाघटा पाणी पिऊ नका. पाणी गिळल्याने डायाफ्रामच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि उचकी थांबते. उचकीवर घरगुती उपायांमध्ये हमखास केला जाणारा आणि सर्वात जास्त वापरण्यात येणारा हा उपाय आहे.

व्हिनेगर
अॅपल साईडर व्हिनेगर एक चमचा मॅपल सिरप एक ग्लास गरम पाण्यात व्हिनेगर आणि मॅपल सिरप मिक्स करा आणि हळूहळू प्या.  उचकी लागल्यावर एकदा हा पर्याय वापरणे. उचकी लागल्यावर उपाय करताना या उपायचाही वापर करता येतो. व्हिनेगर गळ्याचा भाग, कॅव्हिटी आणि तोंडाच्या मागील भागाला उत्तेजित करून उचकी लागण्याच्या समस्येतून सुटका मिळवून देतो.

दही
एक कप दही, एक चमचा मीठ दह्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा आणि हळूहळू खा. एकदाच याचे सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळतो. कधी कधी पोट फुगल्यामुळे उचकी लागते. उचकी लागण्याच्या कारणांमध्ये आपण याचा समावेश केला आहे. यादरम्यान दही महत्त्वपूर्ण काम करते. दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स हे पोट फुगल्यास, त्यावर आराम मिळवून देते आणि उचकी बंद करण्यास मदत करते. उचकी लागणे घरगुती उपाय करताना तुम्ही दह्याचाही वापर करू शकता.

संकलन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६
इमेल -subodh.ranshevre @rediffmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here