उपयोगितेचे प्रकार

0

 

अर्थशास्त्र लेख माला : भाग २०

उपयोगितेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एकूण उपयोगिता आणि दुसरे म्हणजे सीमांत उपयोगिता होय. उपयोगितेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एकूण उपयोगिता आणि दुसरे म्हणजे सीमांत उपयोगिता होय. डॉ. मार्शल यांनी उपयोगितेचे विश्लेषण संख्यात्मक दृष्टिकोणातून (Cardinal Approach) केले आहे. बा दृष्टिकोनामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता अशा संकल्पनांचे स्पष्टीकरण केले आहे. आता आपण या दोन्ही संकल्पनांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करणार आहोत.

 

(अ)  एकूण उपयोगिता (Total Utility) :

“एखाद्या विशिष्ट वेळी उपभोक्त्याने उपभोगलेल्या विशिष्ट वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय.

उदा. समजा, उपभोक्ता भाकरीचा उपभोग घेत आहे. उपभोक्त्याने १, २, ३, ४, ५ अशा प्रकारे क्रमाने ५ भाकरीचा उपभोग घेतला. त्यावेळी त्यास पहिल्या भाकरीपासून २५ एकक, दुसऱ्या भाकरीपासून २० एकक, तिसऱ्या भाकरीपासून १५ एकक, चौच्या भाकरीपासून १० एकक आणि ५ व्या भाकरीपासून ५ एकक उपयोगिता मिळते. या सर्व ५ नगांच्या भाकरीच्या उपभोगापासून उपभोक्त्याला एकूण ७५ एकक अशी एकूण उपयोगिता मिळते. यामध्ये सर्व नगापासून मिळालेल्या उपयोगितांची बेरीज कली जाते. उपभोक्ता जेवढ्या जास्त नगांचा उपभोग घेईल तेवढी त्याला एकूण उपयोगिता जास्त मिळेल.

प्रतिकात्मक (Symbolically) स्वरुपात एकूण उपयोगिता आपण पुढीलप्रमाणे स्पष्ट करू.

TuX = f(QX)

TuX X वस्तूची एकूण उपयोगिता

f कार्यात्मक संबंध

याचा अर्थ एकूण उपयोगितेचा वस्तूच्या नगसंख्येशी प्रत्यक्ष संबंध आहे.

QX = x वस्तूचे नग

 

(ब) सीमांत उपयोगिता (Marginal Utility):

सीमांत उपयोगिता आपण पुढील व्याख्येच्या आधारे स्पष्ट करू,

“उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या विशिष्ट वस्तूच्या उपभोगात एका नगाने वाढ केल्यास त्याच्या एकूण उपयोगितेत जी वाढ होते त्यास ‘सीमांत उपयोगिता’ म्हणतात.”

उपयोगितेत नैतिकतेला स्थान नाही उपयोगितेचा नैतिक दृष्टिकोनातून विचार केला जात नाही. : व्यवतीची वस्तूच्या उपभोगातून गरज भागते की नाही एवढाच विचार उपयोगितेमध्ये केला जातो. उदा. दोन गिज्यामुळे एखाद्या व्यक्तीची गरज भागते परंतु दारू पिणे नैतिकदृष्ट्या इष्ट कि अनिष्ट याचा विचार केला जात नाही.

उपयोगिता समाधानापासून वेगळी असते व्यक्तीने एखाद्या वस्तूचा उपभोग घेतला म्हणून त्या व्यक्तीस समाधान मिळेल असे नाही. वस्तूच्या उपभोगामध्ये प्रथम उपयोगिता येते आणि नंतर प्रत्यक्ष उपभोगानंतर समाधान येते. उपयोगिता म्हणजे अपेक्षित समाधान होय.

उपयोगिता घटत जाते एखाद्या वस्तूच्या नगाचा सातत्याने उपयोग येत गेल्यास उपभोक्त्याला त्यापासून मिळणाऱ्या उपयोगितेत घट होत जाते. उदा. पहिल्या भावापासून जेवढी उपयोगिता मिळते त्यापेक्षा कमी उपयोगिता दुसऱ्या भाकरीपासून मिळते.

क्रमशः 

डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका : प्राध्यापिका (अर्थशास्त्र)
मेल. drritashetiya14@gmai.com

Leave A Reply

Your email address will not be published.