लातूर – तालुक्यातील कोळपा येथे बौद्ध विहाराच्या जागेत झेंडा रोवताना विद्युत तारेच्या शॉकने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे गावावर पसरली आहे. चार महिन्यांपूर्वी गावाच्या प्रवेशद्वाराला लागून बौद्ध विहारासाठी एक गुंठा जागा देण्यात आली होती. या संबंधीचा ठराव ग्राम पंचायतीच्या बैठकीत झाल्यानंतर झेंडा लावल्याचा निर्णय झाला. त्यानंतर अंकुश कांबळे व सुरज गायकवाड यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यानुसार अंकुश सुरज यांनी खड्डा खोदून लोखंडी पोल उभा करत होते. दरम्यान या ठिकाणी अकरा किलोव्हॅटची लाईन गेली होती. पण झेंडा उभारताना विद्युत तारेला स्पर्श झाला आणि ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेमध्ये अंकुश कांबळे व सूरज गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर गोपाळ झोडपे व अजित जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. खड्डा खणून झाल्यानंतर उभा करत असलेल्या लोखंडी पाईप वरून जाणाऱ्या एकरा किलोव्हॅटच्या तारांना चिकटला आणि यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांचा जागेस मृत्यू झाल्याचे समजते. अन्य दोघांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. यामुळे सर्वत्र व्यक्त हळहळ करण्यात येते आहे. दोघांच्या मित्रांनी व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


