Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नका!
    • आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला
    • अपुऱ्या पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करा!
    • मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला
    गुन्हे वार्ता

    पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

    एकाची प्रकृती चिंताजनक; साकेगाव बसस्थानकावरील घटनेने खळबळ
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2026No Comments228 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना मंगळवारी (दि. २९) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राहुल संतोष कोळी (वय २४) आणि कुणाल बाळू वाघ (वय २३, दोन्ही रा. साकेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

    राहुल कोळी आणि कुणाल वाघ हे दोघे साकेगावातील एकाच गल्लीत वास्तव्यास असून हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी रात्री दोघेही उपचारासाठी गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जाण्यासाठी साकेगाव बसस्थानकावर आले होते. त्यावेळी भुसावळ येथील काही तरुण तेथे आले. जुन्या वादातून त्यांच्यात वाद सुरू झाला.

    काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयितांनी धारदार शस्त्राने राहुल कोळी याच्या मानेवर वार केला, तर कुणाल वाघ याच्यावरही हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात सहभागी संशयितांची ओळख पटविण्यासह त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    साकेगाव बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, भुसावळ तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    दिल्लीतील आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif