Sunday, November 27, 2022

धक्कादायक; भुसावळातील दोन तरुण अभियंत्यांना भरधाव डंपरने चिरडले…

- Advertisement -

 

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील रहिवासी व पुण्यात अभियंता पदावर नोकरीस असलेल्या उच्च शिक्षीत तरुणांचा भरधाव दुचाकी डंपरवर आदळल्याने मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील मुन्ना तेली यांच्या भारत पेट्रोल पंपासमोर सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने ऐन दिवाळीत कुटुंबावर संकट कोसळले आहे.

अरफाज मोहम्मद इम्तियाज कासीम (22) रा.आझाद मार्केट, खडका रोड, भुसावळ व विष्णू गोविंद कारमुंगे (22) गरूड प्लॉट, भुसावळ अशी मयत तरुणांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावर घडला अपघात अरफाज व विष्णू हे दोघे मित्र केटीएम (एम.एच.19 सी.टी.8572) ने भरधाव वेगाने जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मुन्ना तेली यांच्या भारत पेट्रोल पंपासमोर डंपरला पाठीमागून धडक दिल्याने दोघे मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

दोघांनाही खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ऐन दिवाळी सणात झालेल्या अपघातात तरुणांचा मृत्यू ओढवल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

मयत अरफाज हा भुसावळातील पत्रकार मो.इम्तियाज यांचा मुलगा आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिण असा परीवार आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या