अट्टल दुचाकी चोर जेरबंद…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जिल्ह्यात वेगवेळ्या गावांसह शहरात अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरुन त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल चोर संशयित आरोपी दादा बारकु ठाकुर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, ठाकुरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता. त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलिसांसह दुचाकीचालक कमालीचे हैराण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांपुर्वी अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून चार गुन्ह्यातील मोटार सायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. ताब्यातील अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी दादा बारकु ठाकुर याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

अटकेतील दादा ठाकुर याने त्याच्या साथीदार व अल्पवयीन बालकाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटार सायकलची चोरी केल्याचे कबुल केले आहे. अटकेतील दादा ठाकुर व ताब्यातील अल्पवयीन बालकाकडून एकुण नऊ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामानंद नगर, जिल्हापेठ पोलिस स्टेशन, धरणगाव, जामनेर, एरंडोल, अमळनेर आदी पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकली जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय शामराव पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.