Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
    अपघात

    अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 27, 2026No Comments363 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील आर.एल. चौफुली परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय 48) यांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या घरी परतत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदीप अलकरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

    घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून, संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.

    संदीप अलकरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif