Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार
    अपघात

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार

    चिमुकली बालंबाल बचावली : तोरणाळा येथील दुर्दैवी घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2026No Comments682 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव-जामनेर महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या भीषण अपघातात त्यांच्या सोबत असलेली केवळ एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय 50) आणि सोनाली गोपाल खडके (वय 45, रा. सातबारा) हे आपल्या दुचाकीने घरी परतत होते. जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळील स्मशानभूमीजवळ आले असताना, वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, समोरून चाललेल्या एका ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाळ खडके आणि सोनाली खडके हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षाची लहान मुलगी देखील होती. मात्र, निसर्गाचा चमत्कार म्हणावा की दैव बलवत्तर, इतक्या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.

    अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जामनेर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif