अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात

पिंपळगांव व महिंदळे येथे कारवार्इ : महसूल विभागाची धडक

0

भडगाव : तालुक्यातील पिंपळगांव व महिंदळे येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी दिली.
ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव बु. पथकातील ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, सुनील मांडोळे, महादू कोळी, गितेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम. जे.खाटीक, अभिमन्यू वारे आदींनी केली. महिंदळे येथून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय येथे जमा केले. या पथकात अनिल निकम, प्रमोद पाटील,एम. जे. खाटिक, महसूल सेवक विशाल सूर्यवंशी, अमोल पाटील आदींची समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.