Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दहशत माजविणारे दोन सराईत गुन्हेगार तडीपार
    ताज्या बातम्या

    दहशत माजविणारे दोन सराईत गुन्हेगार तडीपार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 23, 2026No Comments179 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव – आगामी सण-उत्सव, विधान परिषद सार्वत्रिक निवडणुका 2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
    दि. 21 मे 2026 रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (1) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. संबंधित आरोपींना आदेश मिळाल्यानंतर दोन दिवसांच्या आत जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पुढील एक वर्ष जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून, सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात येता येणार नाही. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राम उर्फ सोनू भगवान सारवान (रा. गुरुनानक नगर, जळगाव) याचा समावेश आहे. त्याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, मारामारी तसेच यापूर्वीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात 13 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    दुसरा आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, चांगापाचा मंदिराजवळ, जळगाव) याच्यावरही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. घातक शस्त्रांचा धाक दाखवून नागरिकांना धमकावणे, रात्रीच्या वेळी दुकाने व घरफोड्या करणे, तसेच गंभीर स्वरूपाचे मारहाणीचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तडीपारीच्या कालावधीत दोन्ही आरोपींना ते ज्या भागात वास्तव्यास राहतील, त्या परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात दरमहा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. नागरिकांनी निर्भयपणे राहावे. जळगाव पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत. भविष्यातही अशा समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif