लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या चार दिवसांपूर्वी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शशिकांत पारधी व राकेश पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. या घटनेनंतर दोघी गंभीर जखमी होते. कायद्याचे रक्षण करणारेच जर रस्त्यावर गुन्हेगारांसारखे हाणामारी करत असतील तर जनतेने न्यायासाठी जायचे कोणाकडे असा सवाल पोलीस खात्यावर उपस्थित केला जातोय.
या घटनेची पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेत दोघांना निलंबीत केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी ही माहीती दिली. या प्रकाराची महाराष्ट्रभर निंदा होत असून पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगण्याचे काम यांनी केले असून सर्वत्र याच गोष्टींची चर्चा सुरू आहे.

