Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    दोन घटनांमध्ये गळफास : महिनाभरात नववी घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 17, 2026No Comments918 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एकाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. तर पिंपळगाव खुर्द येथील शेती शिवारातील धानोरी रस्त्यावरील झाडाला दोरी बांधून एका अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या दोन घटनांमुळे वरणगाव व परिसरात महिनाभरात आत्महत्येची नववी घटना घडली आहे.

    वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलगाव येथील रहिवासी तुषार उर्फ ताणिया (किन्नर) अनंत बावस्कर (३१) हा १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी जेवणासाठी भाजी बनवून, ‘मला भूक लागली आहे, लवकर पोळ्या बनव,’ असे आईला सांगून घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. पोळ्या तयार झाल्यानंतर आईने तुषारला जेवणासाठी हाक मारली. मात्र, वरच्या मजल्यावरील खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आईने वर जाऊन पाहिले असता तुषारने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले.

    तुषारच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत मयताची आई रेखा अनंत बावस्कर यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राठोड व ईश्वर तायडे करीत आहेत.

    दुसरी घटना पिंपळगाव खुर्द येथे घडली. पिंपळगाव शेती शिवारातील धानोरी रस्त्यावर असलेल्या एका झाडाला ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्तीने लांब रुमाल बांधून गळफास घेतल्याचे रानभाज्या वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमाच्या निदर्शनास आले.

    या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सपकाळ व गोपीचंद सोनवणे करीत आहेत. गेल्या महिनाभरात वरणगाव व परिसरात सातत्याने आत्महत्येच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif