Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»हवेतच दोन हेलिकॉप्टर धडकले : प्रसिद्ध गायकाचा मृत्यू
    अपघात

    हवेतच दोन हेलिकॉप्टर धडकले : प्रसिद्ध गायकाचा मृत्यू

    संगीत विश्वावर शोककळा : ३२ व्या वर्षी अपघाती मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2026No Comments775 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ‘लाइफ गोज ऑन’, ‘व्हेन आय एम डाऊन’ आणि ‘मिस यू’ यांसारख्या गाण्यांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक ऑलिव्हर ट्री यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ऑलिव्हर ट्री हे अमेरिकेचे प्रसिद्ध गायक होते. गायकाचा वयाच्या ३२ वर्षी मृत्यू झाला.

    मिळालेल्या वृत्तानुसार, ऑलिव्हर ट्री यांचा रिओ दि जानेरोमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी 14 जून 2026 ला घडला. रविवारी सकाळी रिओ दि जानेरोच्या नैऋत्य भागात झालेल्या या अपघातात दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक झाली. या अपघातात ऑलिव्हर ट्री यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. गायकाच्या मृत्यूची बातमी समजताच संगीत आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी गायकावर श्रद्धांजली वाहिली आहे. गायक ऑलिव्हर ट्री यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    ऑलिव्हर ट्री यांचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. आपल्या बाऊल कट हेअरस्टाइल आणि ८० च्या दशकातील आकर्षक फॅशनसाठी ऑलिव्हर ट्री ओळखले जायचे. त्यांनी २०१३ मध्ये आर अँड एस रेकॉर्ड्स अंतर्गत आपला पहिला ईपी, ‘डेमन्स’ प्रदर्शित केला. २०१६ मध्ये व्हेथनने ‘व्हेन आय एम डाऊन’ हे गाणे प्रदर्शित केले, या गाण्यातील सहभागामुळे ट्री प्रसिद्धीच्या झोतात आले.

    ऑलिव्हर ट्री यांच्या आवाजाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्याने लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या त्याच्या ‘ऑल दॅट x एलियन बॉय’ या डबल म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याने त्याची रेट्रो-अनोखी शैली सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. २०२० मध्ये त्यांनी ‘अगली इज ब्युटीफुल’ हा पहिला स्टुडिओ अल्बम प्रदर्शित केला. ‘एलियन बॉय’ आणि ‘लाइफ गोज ऑन’ या गाण्यांसाठी ऑलिव्हर ट्री ओळखले जायचे. ऑलिव्हर ट्री यांच्या मृत्यूने संगीत विश्वावर शोककळा पसरली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026

    मुसळधार पावसामुळे चाळीवर कोसळली दरड

    August 12, 2026

    पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif