अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर महसूल विभागाच्या ताब्यात

0

भडगाव | प्रतिनिधी

येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर महसूल विभागाने ताब्यात घेतले असून ही कारवाई आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रोडवर अवैध वाळू वाहतूक करताना केली आहे दोन्हीही डंपर भडगाव तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट,
नायब तहसीलदार रमेश देवकर, ग्राम महसूल अधिकारी पि.के.पाटील,दीपक पाटील, राहुल माळी,प्रशांत कुंभारे, महसूल सहायक- महादू कोळी पो.कॉ. पी.सी.कोळी आदींनी केली. या दोन्ही जप्त केलेल्या डंपरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे यावेळी महसूल विभागाकडून माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.