Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
    जळगाव

    समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 5, 2026Updated:March 5, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मासवे) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ आणि ९ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेचा विषय “सामाजिक कायदे : शाश्वत आणि समावेशी विकास साध्य करण्यात कायद्याची भूमिका” असा आहे.

    उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी राहणार असून, उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मधुकर कुऱ्हाडे (प्राचार्य,डी टी एस एस कॉलेज ऑफ लॉ, मालाड, मुंबई), महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष अंबादास मोहिते, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनील पाटील, संस्थेचे सचिव  प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, संचालक डॉ. विनय पाटील, संचालक चंदन अत्तरदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी उपस्थित राहणार आहे. सदर राष्ट्रीय परिषदेचे बीज भाषण मासवे चे संस्थापक अध्यक्ष प्रा.अंबादास मोहिते करणार  आहेत.

    दुपारच्या सत्रात बाल हक्क, प्रतिबंधक कायदे आणि महिला सक्षमीकरण या विषयावर संतोष शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, मुंबई) यांचे व्याख्यान होईल. तसेच, परिषदेच्या विविध विषयावर आधारित बालकल्याण, महिला विकास आणि इतर सामाजिक कायदे यांवर तज्ञांची चर्चा होणार असून, देशभरातून ८१ शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे.

    परिषदेच्या समारोप सत्राचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. पी. आर. चौधरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जळगाव येथील नामांकित  माजी सरकारी वकील ॲड. केतन ढाके, मासवे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, मासवे सचिव डॉ. संजय फुलकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी उपस्थित राहतील.

    दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सामाजिक कायद्यांवर वैचारिक मंथन होणार असून, सर्व प्राध्यापक, संशोधक व रिसर्च स्कॉलर्स, अभ्यासक यांनी सहभाग द्यावा असे आवाहन राष्ट्रीय परिषदेचे संयोजक डॉ. उमेश वाणी, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. प्रशांत भोसले समन्वयक डॉ. यशवंत महाजन सह समन्वयक डॉ.शाम सोनवणे यांचेकडून करण्यात आले आहे.

    Child rights Dhanaji Nana Chaudhary Vidya Prabodhini Maharashtra Association of Social Work Educators MASWE Multidisciplinary National Council preventive laws Public Servant Madhukarrao Chaudhary Social Work College Social Laws Women Empowerment बाल हक्क
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.