Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या
    अपघात

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    दुर्घटनेत SDRF चे १० पोलीस कॉन्स्टेबल बेपत्ता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 5, 2026No Comments167 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडलीये. बेथुपल्ली तलावात अडकलेल्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी अचानक उलटल्या. या दुर्घटनेत १० पोलीस कॉन्स्टेबल बेपत्ता झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे या दोन्ही बोटी उलटल्या. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी डायव्हर्स आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

    खम्मम जिल्ह्यातील सथुपल्ली भागात ही दुर्घटना घडली. या भागातील बेथुपल्ली तलावात पाच मच्छीमार अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF चे पथक दोन बोटी घेऊन तलावात गेले होते. पण बचावकार्य सुरू असतानाच जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दोन्ही बोटी अचानक उलटल्या.

    या घटनेनंतर SDRF चे १० जवान बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी डीप-सी डायव्हर्स आणि बचाव पथकातील कर्मचारी तलावात शोधमोहीम राबवली जातेय. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

    तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. खम्मम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना SDRF च्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास सांगितलंय. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनाही या संपूर्ण घटनेचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    दरम्यान यापूर्वी तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातही एक दुर्घटना घडली होती. याठिकाणी दांडिया कार्यक्रमादरम्यान रोषणाईसाठी उभारलेली कमान अचानक कोसळली होती. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.

    तेलंगणाचे महसूल, गृहनिर्माण तसंच माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी बेथुपल्ली तलावातील दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केलीये. सथुपल्ली मतदारसंघातील बेथुपल्ली तलावात SDRF च्या बोटी उलटल्याच्या घटनेचा सरकारकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेची माहिती घेतली असून SDRF च्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif