Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»डेअरीत लपून बसलेल्या दोन मारेकऱ्यांना पकडले!
    ताज्या बातम्या

    डेअरीत लपून बसलेल्या दोन मारेकऱ्यांना पकडले!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 2, 2026No Comments231 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रदीप पूर्णेकर हत्त्या प्रकरण : पोलिसांच्या नऊ पथकांकडून तपास

    ठाणे : मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाच जणांनी त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि पूर्णेकर यांच्यावर कोयत्याने वार केले होते. यानंतर हे आरोपी पळून गेले होते. यापैकी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात ठाणे गु्‌‍हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला निखिल यादव हा प्रदीप पूर्णेकर यांच्या ऑफिसच्या बाजूला वडापावाच्या गाडीवर काम करायचा, अशी माहिती आहे तर नितेश पवार हा सराईत गुन्हेगार आहे.
    ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली होती. यापैकी पप्या शिंदे याला पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले होते. तर आता निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अलिबागजवळ एका डेअरीत हे दोन्ही आरोपी लपून बसले होते. काल पोलिसांनी मिरा-भाईंदरमधून पप्या शिंदे याच्या संपर्कात असलेल्या काही महिला व पुरुषांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना आरोपी लपून बसू शकतात, असा संभाव्य ठिकाणांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अलिबागजवळच्या डेअरीवर छापा टाकून निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना ताब्यात घेतले. यापैकी निखिल यादव याने प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तर नितेश पवार उर्फ भावड्या याने प्रदीप पूर्णेकर यांच्यावर कोयत्याने वार केले होते. नितेश पवार हा हिस्ट्रीशिटर गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif