लोकशाही न्युज नेटवर्क
यावल – दत्तक पत्र व नावे केलेले शेत जमिनीचे कागदपत्र खोटे बनविण्याचे सांगत पत्रकार व एका अन्य व्यक्तीकडून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहीती अशी की, येथील शहरातील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांच्या पत्नीचे दत्तक प्रकरण व तिचे नावे दत्तक वडिलांनी करून दिलेले शेतीचे प्रकरण खोटे व गंभीर असल्याचे सांगत व ते प्रकरण दाबण्यासाठी येथील पत्रकार सुरेश पाटील व विरावली येथील संजय उत्तम पाटील एक लाख रुपयाची खंडणी मागितल्याची फिर्यादी इस्माईल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत येथील पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील पूर्णवाद नगरातील रहिवासी इरफान इस्माईल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी परविन हिस सुभान अमीर तडवी यांना मुलगा नसल्याने त्यांच्या साळूची मुलगी परविन हिस दत्तक घेतले. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर त्यांनी ३० जुलै २१ रोजी तहसीलदार यांचे कार्यालयात त्यांची यावल शिवारातील शेत गट नंबर 2283 क्षेत्र दोन हेक्टर ०२आर ही सुभान तडवी यांचे नावे असलेली शेत जमीन त्यांची दत्तक परविन हीस नातेवाईक व पंच मंडळी समक्ष दत्तक घेत तहसीलदार यांचे कडे अधिनियम 1966 ते कलम 85 नुसार नुसार कुटुंब वाटणी पत्र तयार केले व परविन हिस ७/१२ मध्ये समाविष्ट केले.
१ जानेवारी २३ रोजी, आठ वाजेचे सुमारास इरफान तडवी यांचा मोबाईल फोनवर येथील संजय उत्तम पाटील यांचे यावल येथे असलेले मोटर गॅरेजवर गॅरेज चालक संजय पाटील व पत्रकार सुरेश पाटील यांनी इरफान तडवी यांना बोलावत ‘तुझ्या पत्नीचे दत्तक प्रकरण व शेतजमिनीचे प्रकरण माहीत झाले आहे , हे प्रकरण मी बाहेर काढेल’ असे पत्रकार सुरेश पाटील यांनी सांगत तुझ्या पत्नीला ,सासर्यावला ,व तहसीलदार यांना महागात पडेल हे प्रकरण दाबण्यासाठी एक जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान वेळोवेळी मोबाईलवर फोन करून एक लाख रुपयाची मागणी केली एकदम एक लाख रुपये जमत नसतील अन्यथा वृत्तपत्रात बातमी छापून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून येथील पत्रकार सुरेश पाटील व संजय उत्तम पाटील यांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दत्तक प्रकरण व शेतीचे प्रकरणाची माहिती माहिती अधिकारात मागितल्याने इरफान तडवी यांना रा आल्याने ही फिर्याद दाखल केली असल्याची प्रतिक्रिया पत्रकार सुरेश पाटील यांनी दिली आहे.