जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून सर्वत्र तपासणी करण्यात येत असून आज दि. 7 रोजी 11:30 वाजेदरम्यान शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात तपासणी करीत असतांना एका वाहनात तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. ही रक्कम शहरातील एका प्रसिद्ध फर्मची होती. संपूर्ण तपासणीत रक्कम वैध असल्याचे समोर आल्याने सदर रक्कम व्यापाऱ्याला परत करण्यात आली.
शहरातील गजबजलेल्या पुष्पलता बेंडाळे चौकात आज गुरुवार दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 च्या दरम्यान पोलिस पथक वाहन तपासणी करीत असतांना एका चारचाकी गाडीत तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड आढळून आली. पोलिस यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर ही रक्कम वैध असल्याचे समोर आले.