14 वर्षांचा मुलगा तुर्की भूकंपाच्या 11 दिवसांनी ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर…(व्हिडीओ)

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तुर्कस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी आपले कुटुंब गमावले. काहींनी आपले पालक गमावले आहेत तर काहींनी आपली मुले गमावली आहेत. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. दरम्यान एक चमत्कार घडला. 11 दिवसांनंतरही 14 वर्षांच्या मुलासह दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली 11 दिवस उलटूनही कोणीतरी जिवंत असणे म्हणजे चमत्कारच आहे. 14 वर्षीय उस्मानला सुखरूप बाहेर काढल्यानंतर मदत आणि बचाव पथकाने आणखी दोन जणांची सुटका केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विट करून उस्मानच्या सुरक्षित बचावाची माहिती दिली. लोक त्याच्या पोस्टला खूप पसंत करत आहेत. या ट्विटवर लोक कमेंट करत आहेत. अनेक यूजर्स याला चमत्कार म्हणत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, 14 वर्षीय उस्मान 260 तासांनंतर पुन्हा आमच्यासोबत आहे.

तुर्कस्तानच्या हाते प्रांतात गुरुवारी रात्री बचाव कर्मचार्‍यांनी आणखी दोन जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. प्रत्यक्षात, शोध आणि बचाव पथकाला 26 वर्षीय मेहमेत अली आणि 34 वर्षीय मुस्तफा अवसी हे अंताक्यामध्ये ढिगाऱ्याखाली दबलेले आढळले. दोघांचाही दम लागला होता. अशा परिस्थितीत बचावकर्त्यांनी तत्काळ मदत करत दोघांचीही ढिगाऱ्यातून सुटका केली.

11 दिवसांनी म्हणजेच 260 तासांनंतरही लोक जिवंत राहणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ही घटना लोकांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here