आश्चर्यकारक; २१ दिवसांनी घोडा जिवंत सुखरूप…(व्हिडीओ)

0

 

तुर्की, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तुर्की येथे झालेल्या भीषण भुंकंपाला जवळ-जवळ महिना होत आला आहे, तरी तेथे अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. अडकलेल्या लोकांना आणि ढिगारा हळूहळू बाजूला काढण्याचं काम येथे अद्यापही सुरु आहे. या काळात अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. तर काहीजण अशा परिस्थीतही तग धरुन राहिले, ज्यांना जिवंत बाहेर देखील काढलं गेलं. या सगळ्यात आता आणखी एक बातमी समोर आली आहे की, तब्बल २१ दिवसांनी एका घोड्याला देखील वाचवण्यात यश आलं आहे. 27 फेब्रुवारीला घोडा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/WHR/status/1630616600352112653?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1630616600352112653%7Ctwgr%5Eafafa0d0d30137a3b2d57afaee2c4c7326ef6ae1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fturkey-syria-earthquake-horse-rescue-after-21-days-video-viral-on-internet-mhds-840427.html

तेथीलच एक व्हिडीओ व्हायरल झाला, जो एका घोड्याच्या बचावाचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुर्कीचे उद्योगपती तानसू येगेन सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले- आश्चर्यकारक, बचाव पथकाने 21 दिवसांनी घोड्याला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले.

तुर्की-सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये आतापर्यंत एकूण 50 हजार 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. आदिमान हे भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.