शेतकऱ्यांनो.. तुर नोंदणीचा लाभ घ्या !

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन, १६ खरेदी केंद्र कार्यरत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत हंगाम २०२४-२५ तुर खरेदी करीता जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव असे एकूण १६ खरेदी केंद्र कार्यरत आहे.

शेतकऱ्यांना दि. २४ जानेवारीपासून पुढे ३० दिवसापर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २०२४-२५ करिता तुर हमीभावाची किंमत ७५५०/- इतकी आहे.

तरी शेतकरी बंधुंनी तुर नोंदणीचा लाभ घेवून ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ. कागदपत्रे घेवून खरेदी केंद्रांवर तुर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक. मंत्री. संजय सावकारे, उपाध्याक्ष रोहित निकम, संचालक संजय मुरलीधर पवार तसेच एस.एस.मेने (प्र. जिल्हा पणन अधिकारी, जळगाव) यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.